सारथीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, आर्थिक समस्यांमुळे त्रस्त, सरकार घालणार का लक्ष..
पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थी तणावात आहेत. पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रुजू झाले खरे परंतु त्यांना विद्यावेतन मिळत नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बार्टी, टार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुदान मिळत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना (Economically weak students) विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. मात्र, मागील काही महिन्यांपासून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Sarthi Scholarship) मिळालेली नाही, त्यामुळे हे विद्यार्थी आर्थिक समस्यांनी (Financial problems for students) त्रस्त झाले आहेत. 'सारथी' महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील संस्था आहे. त्यामुळे सरकार आता याकडे लक्ष घालणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थी तणावात आहेत. पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रुजू झाले खरे परंतु त्यांना विद्यावेतन मिळत नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बार्टी, टार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुदान मिळत आहे. परंतू सारथी च्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याची भावना या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे सारथी मध्ये शिक्षण घेणारे सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे.
__________________________________________
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
- सुप्रिया सुळे, खासदार
___________________________________________
मागील दोन महिन्यापासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना नीधी मिळत नसल्याने आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत. यामुळे महिन्याचा खर्च भागवणे कठीण होऊन बसले आहे. सरकारने वेळेत नाही उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा. यामध्ये असेही काही विद्यार्थी आहेत.
- शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी