प्राचार्य,प्राध्यापकांचे एक दिवसाचे वेतन शेतकरी,पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा 

संकटाच्या काळात समाजातील विचारवंत व मार्गदर्शक वर्ग म्हणून शिक्षकांनी समाजाच्या पाठीशी उभी राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्राध्यापक प्राध्यापक बांधवांनी स्वेच्छेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

प्राचार्य,प्राध्यापकांचे एक दिवसाचे वेतन शेतकरी,पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या संकट काळात सर्व शिक्षक बांधवांनी एकात्मतेची व सामाजिक भूमिका दाखवत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे करण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने आपले एक दिवसाचे वेतन कतपात करण्याची विनंती शासनाकडे केली असून इतरही प्राध्यापक संघटनांनी याबाबत पुढाकार घ्यावा,असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी डॉ. डी.बी. पवार व प्रा. ए.पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

कोरोनाच्या वैश्विक संकटात सर्वांनी एकमेकांना मदत केली. राज्यातील समस्याग्रस्त जनतेला आधार देण्यासाठी पुढाकार घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला. पूरजन्य परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. शासनाकडून याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र,संकटाच्या काळात समाजातील विचारवंत व मार्गदर्शक वर्ग म्हणून शिक्षकांनी समाजाच्या पाठीशी उभी राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्राध्यापक प्राध्यापक बांधवांनी स्वेच्छेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच शासनाने प्राध्यापकांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घ्यावे, याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खेडकर आणि महासचिव वैभव नरवडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
प्राध्यापकांनी दिलेल्या छोट्याशा योगदानातून राज्यातील हजारो कुटुंबांना नवा दिलासा मिळणार आहे. शिक्षक बांधवांनी समाजाभिमुख भावना कृतीतून दाखवण्याची गरज आहे. त्यामुळेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डी.बी पवार यांनी दिली.