नर्सिंग कॉलेजच्या ४ मुलींचा प्राचार्यानीच केला विनयभंग

नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील ४ विद्यार्थिनीने विनयभंगाचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याचे नाव आहे.

नर्सिंग कॉलेजच्या ४ मुलींचा प्राचार्यानीच केला विनयभंग

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

नाशिक जिल्ह्यातून (Nashik Crime News) गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील (Nursing College of Nashik) प्राचार्याने ४ विद्यार्थीनीचा विनयभंग (4 molestation of a female student) केल्याची घटना समोर आली. प्रवीण घोलप असे आरोपी प्राचार्याचे नाव आहे. नाशिकमधील नामांकित कॉलेजच्या प्राचार्य विरोधात भद्राकली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील ४ विद्यार्थिनीने विनयभंगाचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राचार्याला अटक केली आहे. नाशिक पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

नाशिकमध्ये एका खासगी नर्सिंग कालेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी ५ आगस्ट २०२४ पासून २९ मे २०२५ पर्यंत द्वारका सर्कल येथील एका कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शिक्षण घेत होती. या काळात प्राचार्य प्रवीण घोलप यांनी वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला. तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला. त्याने पीडितेची साडी ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनयभंग केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

ही धक्कादायक घटना घडली त्या वेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती. तिच्या अन्य मैत्रीणीसोबत देखील असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजली. त्यानंतर पीडित मुलीने हिम्मत करत भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून संशयित प्रवीण रमेश घोलप याला अटक करण्यात आली आहे.