स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर
निकाल जाहीर होण्यासोबतच, श्रेणीनुसार किमान पात्रता कटऑफ देखील जाहीर केला जाईल. निश्चित कटऑफ गुण मिळवणारे उमेदवारच भरतीच्या अंतिम टप्प्यात, स्थानिक भाषा चाचणीत बसू शकतील. अंतिम टप्प्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती यादीत स्थान दिले जाईल आणि रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
निकाल कसा तपासणार ?
* एसबीआय मेन्स निकाल २०२५ तपासण्यासाठी, अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जावे लागेल.
* वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर, चालू ओपनिंगमध्ये, भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
* यानंतर, मुख्य परीक्षेच्या रिझल्ट लिंकवर क्लिक करावे लागेल.
* आता स्क्रीनवर पीडीएफ उघडेल ज्यामध्ये तुम्ही रोल नंबर पाहू शकता.
मुख्य परीक्षेत यशस्वी होणाऱ्या सर्व उमेदवारांना भरतीच्या अंतिम टप्प्यात स्थानिक भाषा चाचणीत सहभागी व्हावे लागेल. या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतरच उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल.
निकाल जाहीर होण्यासोबतच, श्रेणीनुसार किमान पात्रता कटऑफ देखील जाहीर केला जाईल. निश्चित कटऑफ गुण मिळवणारे उमेदवारच भरतीच्या अंतिम टप्प्यात, स्थानिक भाषा चाचणीत बसू शकतील. अंतिम टप्प्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती यादीत स्थान दिले जाईल आणि रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल.
या भरतीद्वारे देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण १३ हजार ७३५ पदांवर नियुक्त्या केल्या जातील. श्रेणीनुसार, ५हजार ८७० पदे सामान्य प्रवर्गासाठी, १ हजार ३६१ पदे ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी, ३ हजार ००१ पदे ओबीसी प्रवर्गासाठी, २ हजार ११८ पदे अनुसूचित जातीसाठी आणि १ हजार ३८५ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.