JEE Advanced परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार 

जे विद्यार्थी JEE Main 2025 मध्ये पात्र ठरले होते, त्यांनाच Advanced परीक्षेस बसण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा देशभरातील IIT सह प्रमुख अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते. 

JEE Advanced परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार 

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

JEE Advanced 2025 परीक्षेचा (JEE Advanced 2025 Exam) निकाल उद्या 2 जून रोजी जाहीर (Results announced) होणार आहे. ही माहिती IIT कानपुर, (IIT Kanpur) या वर्षीच्या परीक्षेच्या आयोजक संस्थेने दिली आहे. विद्यार्थी आपले स्कोअरकार्ड (Student Scorecard) अधिकृत संकेतस्थळ www.jeeadv.ac.in वर लॉगिन करून उमेदवार पाहू शकतात. 

जे विद्यार्थी JEE Main 2025 मध्ये पात्र ठरले होते, त्यांनाच Advanced परीक्षेस बसण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा देशभरातील IIT सह प्रमुख अभियांत्रिकी संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते. 

निकाल पाहण्यासाठी प्रक्रिया -

प्रथम अधिकृत वेबसाइट www.jeeadv.ac.in ला भेट द्या. 'JEE Advanced 2025 Result' या लिंकवर क्लिक करा. 
आपला रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करा. स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल; ते डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करा . 

हा निकाल म्हणजे देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांगध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या निवड प्रक्रियेतील गहत्त्वाचा टप्पा आहे. आता पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना The Joint Seat Allocation Authority (JoSAA) काउंसिलिंग प्रक्रियेतून प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे. IITS, NITS, IIITS आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये जागावाटप या प्रक्रियेद्वारे होईल. अधिक माहिती आणि अद्ययावत घोषणांसाठी विद्यार्थांनी https://www.jeeadv.ac.in या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.