आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करणारी दृष्टी निर्माण करणे म्हणजे उद्योजकता
या स्पर्धेतून निवडलेल्या या पहिल्या तीनही स्टार्टअप्सला युरेका २०२४, IIT Bombay या पुढील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय निर्माण करणे नव्हे; बदलाला प्रेरणा देणारी, नवकल्पना वाढवणारी आणि आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करणारी दृष्टी निर्माण करणे हे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर (Savitribai Phule Pune University Pro-vc Dr. Parag Kalkar)यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक आणि उपकरणशास्त्र विभगातर्फे आयोजित ' पिचफेस्ट - २०२४' या झोनल लेव्हल आयडिया पिचिंग स्पर्धा, राष्ट्रीय एंटरप्र्नुरल चॅलेंज, IIT Bombay यांच्या अंतर्गत दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रा. पराग काळकर बोलत होते.या प्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व स्पर्धेचे आयोजक प्रा. विकास मठे आणि समन्वयक डॉ. शामल चिनके यांचे विशेष अभिनंदन केले.
या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन उद्योग विषयक सृजनशील कल्पनांना चालना देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. तसेच योग्य मार्गदर्शनासह स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पुणे शहर आणि जवळपासच्या भागातिल २८ स्टार्टअपस सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल अँड कॉम्पुटर इंजिनेरींग डीआरडीओ- डीआईएटीच्या संचालिका प्रा. मनीषा नेने यांच्या हस्ते करण्यात आले.उद्योजक आत्मनिर्भर भारताचा कणा म्हणून काम करतील, असे नेने यांनी सांगितले.
स्पर्धेतील संकल्पनांचे परीक्षण व मार्गदर्शन प्रा. अरविंद शाळीग्राम, प्रा. श्यामला गोपालन, श्री. किरण नवाथे, प्रा. मिलिंद निकाळजे यांनी केले. यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून साक्षी सुर्वे व साक्षी चव्हाण या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक तसेच मुनिफ अन्सारी याने द्वितीय क्रमांक व यश कोळंबे या विद्यार्थ्याला तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेतून निवडलेल्या या पहिल्या तीनही स्टार्टअप्सला युरेका २०२४, IIT Bombay या पुढील स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.