शाळा सुरू असताना वर्गात शिरली, शिक्षिकेचे केस पकडून विद्यार्थ्यांसमोर हायव्होल्टेज ड्रामा केला

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरातील एका प्राथमिक शाळेत शुक्रवारी भरदिवसा एक अभूतपूर्व आणि चिंताजनक घटना घडली. एका विवाहित पुरुषाच्या पत्नीने थेट शाळेच्या परिसरात घुसून एका शिक्षिकेचे केस पकडले आणि विद्यार्थ्यांसमोरच मोठा ड्रामा रंगवला.

शाळा सुरू असताना वर्गात शिरली, शिक्षिकेचे केस पकडून विद्यार्थ्यांसमोर हायव्होल्टेज ड्रामा केला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरातील एका प्राथमिक शाळेत शुक्रवारी भरदिवसा एक अभूतपूर्व आणि चिंताजनक घटना घडली. एका विवाहित पुरुषाच्या पत्नीने थेट शाळेच्या परिसरात घुसून एका शिक्षिकेचे केस पकडले आणि विद्यार्थ्यांसमोरच मोठा ड्रामा रंगवला. या प्रकारामुळे शाळेच्या आवारात मोठी घबराट पसरली आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवून शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पुरुष स्वतःला उच्चशिक्षित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखतो. वर्षभरापूर्वी त्याचे या प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेशी संबंध जुळले. हळूहळू हे संबंध वाढत गेले. तो पुरुष शिक्षिकेला शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी स्वतःच्या वाहनाने नेवासा फाट्यापर्यंत ये-जा करू लागला. रात्री उशिरापर्यंत चालणारे व्हॉट्सअॅप संभाषण आणि वारंवार भेटीगाठी यामुळे त्याच्या पत्नीला संशय आला. पत्नीने नवऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि अखेर प्रेमप्रकरण उघडकीस आले.

संतप्त पत्नीने थेट शाळा गाठली. वर्गाबाहेर उभ्या असलेल्या शिक्षिकेला पाहताच तिचा राग भडकला. तिने शिक्षिकेचे केस पकडून सर्वांसमोरच जाब विचारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि कर्मचारी घाबरले. लोक जमा होऊ लागले, तेव्हा शिक्षिकेने तेथून पळ काढला. या घटनेमुळे शाळेच्या वातावरणात मोठा गोंधळ उडाला आणि स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळाली आहे. शाळा सुरू असताना झालेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्रातील शिस्त आणि नैतिकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.