विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर; अधिकृत माहिती जाहीर 

चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए फाउंडेशन सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल ६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळपर्यंत जाहीर होऊ शकतो, असे अधिकृतरीत्या सूचित केले आहे.

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर; अधिकृत माहिती जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए फाउंडेशन सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल ६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळपर्यंत जाहीर होऊ शकतो, असे अधिकृतरीत्या सूचित केले आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. निकाल केवळ ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असेल आणि कोणत्याही पोस्टाने मार्कशीट पाठवली जाणार नाही.

ही परीक्षा २, ५, ७ आणि ९ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर पेन-आणि-पेपर पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली होती. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. ICAI ने जारी केलेल्या नोटीसमध्ये संभाव्य तारखेचा उल्लेख केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सीए फाउंडेशनमध्ये यश मिळवणे हा सीए बनण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर आवश्यक असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर स्कोरकार्ड डाउनलोड करताना नाव, रोल नंबर, एकूण गुण आणि पात्रता स्थिती काळजीपूर्वक तपासावी. स्कोरकार्डमध्ये कोणतीही चूक आढळल्यास संबंधित ICAI अधिकाऱ्यांशी ताबडतोब संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

विद्यार्थी आपला निकाल आणि स्कोरकार्ड खालील अधिकृत वेबसाइट्सवर तपासू शकतात: icai.nic.in, icaiexam.icai.org, icai.org आणि caresults.icai.org. यापैकी caresults.icai.org हे मुख्य निकाल पोर्टल आहे. स्कोरकार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया सोपी आहे. प्रथम caresults.icai.org वर जा, “CA Foundation September 2026 Result” या लिंकवर क्लिक करा, नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर टाका आणि Submit करा. तुम्हाला तुमचानिकाल स्क्रीनवर दिसेल. त्याची तपासून प्रिंट काढून ठेवा. तसेच ICAI ने विद्यार्थ्यांना आपले क्रेडेंशियल्स आधीच तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून निकाल जाहीर होताच सहजपणे स्कोरकार्ड मिळवता येईल.