UPSC ची नवीन वेबसाईट सुरू;आता आधारद्वारे करता येणार नोंदणी 

आयोगाने म्हटले आहे की, आता अर्जदारांना ओळखपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाचा पर्याय मिळेल, ज्यामुळे त्यांची ओळख पडताळणे सोपे होईल. सीडीएस परीक्षा-II, २०२५ आणि एनडीए आणि एनए-II, २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज हे नवीन  पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

UPSC ची नवीन वेबसाईट सुरू;आता आधारद्वारे करता येणार नोंदणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाने उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी https://upsconline.nic.in हे नवीन संकेतस्थळ सुरू (Launching a new website) केले आहे. या पोर्टलद्वारे आता उमेदवारांना सहज ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ज्यामुळे आता उमेदवारांना त्यांच्या नोंदणीमध्ये आधार कार्ड वापरण्याची परवानगी मिळेल. आयोगाने म्हटले आहे की, आता अर्जदारांना ओळखपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाचा पर्याय मिळेल, ज्यामुळे त्यांची ओळख पडताळणे सोपे होईल. सीडीएस परीक्षा-II, २०२५ आणि एनडीए आणि एनए-II, २०२५ साठी अर्ज (Application for CDS Exam-II, 2025 and NDA and NA-II, 2025) करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज हे नवीन  पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

आधारसह नोंदणी करण्याचा सल्ला

UPSC ने म्हटले आहे की आधार कार्ड ओळखपत्र म्हणून स्वीकारल्याने उमेदवारांच्या माहितीची जलद आणि सोपी पडताळणी करणे शक्य होईल. हे एक कायमस्वरूपी ओळखपत्र बनेल जे भविष्यातील सर्व परीक्षांमध्ये उपयुक्त ठरेल. तथापि, जर उमेदवाराला आधार वापरायचा नसेल, तर तो इतर कोणतेही वैध फोटो ओळखपत्र (जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट इ.) देखील वापरू शकतो.

नवीन प्रणाली - काय बदलले आहे?

आता उमेदवारांना नवीन पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. जुनी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) प्रणाली आता बंद करण्यात आली आहे, म्हणजेच भविष्यात फक्त नवीन पोर्टल वापरला जाईल. UPSC ने उमेदवारांना असे सुचवले आहे की त्यांनी जलद नोंदणी पुष्टीकरण मिळविण्यासाठी आणि परीक्षा केंद्रावर पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधार वापरावा.