सोलापूरात 1 हजार 374 पदांसाठी रोजगार मेळावा
सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करावी. हा रोजगार मेळावा उद्या ३० जानेवारी रोजी पार पडणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्ताची बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी (Job opportunities for 10th pass students) चालून आली आहे. सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyay) ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जवळपास १ हजार ३७४ पेक्षा जास्त रिक्तपदे भरली जाणार आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. हा रोजगार मेळावा (Organizing a job fair) उद्या ३० जानेवारी रोजी पार पडणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय (वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिन ऑपरेटर) डिप्लोमा, पदवीधर, ऑफिस असिस्टंट (कार्यालय सहायक), बी. कॉम, अशी विविध प्रकारची एकूण एक हजार ३७४ पेक्षा जास्त रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यासाठी १३ उद्योजकांनी ऑनलाइन मनुष्यबळाची मागणी केली आहे.
नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या (तीन प्रतिसह) गुरूवारी रोजी सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत कुमठा नाका येथील अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहाणे आवश्यक आहे. मेळाव्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला भेटून संपर्क करता येईल, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.