खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण

खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार या जातीतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाहीत, अशांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या (Department of Electronics and Information Technology, Central Government) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (National Electronics and Information Technology) या नामांकित प्रशिक्षण संस्थेद्वारे औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत नि:शुल्क प्रशिक्षण (Free training) देण्यात येणार आहे. याकरीता खुल्या प्रवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Interested students can apply online.) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार या जातीतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाहीत, अशांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठीच्या अटी काय?

अर्जदार लक्षित गटातील असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयाच्या आत असावे. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पदविधारक (आयटी,संगणक विज्ञान, इलेक्ट्रानिक्स, टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल, इन्स्युमेंटेशन अथवा बीएस्सी, बीएसए, बीसीएस, एमएस्सी (संगणक विज्ञान) एमसीए आदी पदवी उत्तीर्ण असावा. अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.

कागदपत्रे कोणती हवीत ?

अर्ज करण्याकरता आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीय आणि रहिवाशी प्रमाणपत्र),  अमृत लक्षित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा. ८ लाख रुपयाच्या खालील उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (२०२५-२६), तसेच शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्राची कागदपत्रांची आवश्यकता आहे.

एनआयईएलआयटी संस्थेच्या https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी गुगल लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अमृत संस्थेच्या आधार संलग्र मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील योजना या टॅबमध्ये जाऊन एनआयईएलआयटी प्रशिक्षण योजना हे बटनावर क्लिक करून अर्जाची नोंदणी करावी.

दरम्यान, टपालाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द किंवा मुदतवाढीबाबत तसेच अर्ज नाकारणे व स्विकारणे, निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक अमृत, यांचेकडे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.

अर्ज भरताना कोणत्याही अडचणी आल्यास info@mahaamrut.org.in या मेल वर अथवा ९७३०१५१४५० या मोबाइल क्र. संपर्क करावा. अधिक माहितीसाठी एनआयईएलआयटी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन 'अमृत'चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.