जर्मनीत चार लाख तरूणांना ड्रायव्हरची नोकरी ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची टंचाई आहे. त्या तुलनेत भारतामधून इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. त्याच हेतूने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची टंचाई (Shortage of skilled manpower) आहे. त्या तुलनेत भारतामधून इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. त्याच हेतूने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार (Memorandum of Understanding for Supply of Manpower) केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे चार लाख तरुणांना रोजगाराची संधी (Productivity to four lakh youth) मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी दिली.
परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण भाषेची मर्यादा आणि संवाद कौशल्य नसल्यामुळे तरुण-तरुणी नोकरीसाठी परदेशात जाऊ शकत नाहीत. पण आता जर्मनीत सध्या एकूण चार लाख वाहनचालकांची गरज आहे. त्यामुळेच भारतातील एकूण चार राज्यांतील चालकांना जर्मन भाषा शिकवून तसेच योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट जर्मनीत पाठवले जाणार आहे.
मुळात जर्मनीमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांची वनवा आहे. त्यामुळे येथे मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. या देशात वाहनचालकांचीही कमी आहे. त्यामुळे भारतातील तरुणांना थेट जर्मनीत जाऊन वाहनचालक होण्याची नामी संधी आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या चार राज्यांतील तरुणांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तशी योजना आहे. त्यामुळे तरुणांना भविष्यात थेट परदेशात नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या डिजिटल सी एन सी सिम्युलेशन लॅबच्या उद्धाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला, या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. संगणकीय माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात एक पाऊल पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ही लॅब विद्यार्थ्यांना सुलभ प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही, असे ते म्हणाले.