UPSC मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा चाणक्य मंडलतर्फे ‘अभिनंदन सोहळा’
हा सोहळा शनिवार ३१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच(स्वारगेट, पुणे) येथे होणार आहे. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी त्यांच्या यशामागील प्रवास, अडचणी व प्रयत्न उपस्थितांसमोर उलगडून सांगणार आहेत. तसेच, 'स्वच्छ व कार्यक्षम, कार्यकर्ता अधिकारी' होण्याचा संकल्पही करणार आहेत.

एज्युवार्त न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC 2024) २०२४ मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी चाणक्य मंडल (Chanakya Mandal Academy) परिवारतर्फे ‘अभिनंदन सोहळा’ आयोजित (Congratulations ceremony held) करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार ३१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच(स्वारगेट, पुणे) येथे होणार आहे. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी त्यांच्या यशामागील प्रवास, अडचणी व प्रयत्न उपस्थितांसमोर उलगडून सांगणार आहेत. तसेच, 'स्वच्छ व कार्यक्षम, कार्यकर्ता अधिकारी' होण्याचा संकल्पही करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्य मंडल परिवार'चे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी असतील. ते 'भारत आणि जग: पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर' या विषयावर विशेष व्याख्यान देतील. कार्यक्रमाला निवृत्त एअर व्हाईस मार्शल किरण पळसुले ,निवृत्त पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, निवृत्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर हे मान्यवर विशेषकरून उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थी सांगणार यूपीएससी यशामागची कहाणी !
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या यूपीएससीच्या २०२४ च्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अवधीजा गुप्ता (जबलपूर, मध्यप्रदेश) भारतात ४३ वी रँक, ऐश्वर्या जाधव(नाशिक )- १६१ वी रँक, कृष्णा पाटील(लातूर)- १९७ वी रँक, पंकज पाटले (गोंदिया)- ३२९ वी रँक, संकेत शिंगटे(सातारा)- ४७९ वा रँक, रोहन पिंगळे (पुणे )- ५८१ वी रँक, दिलीपकुमार देसाई (कोल्हापूर) ६०५ वी रँक, पंकज औटे(बीड)- ६५३ वी रँक यांचासह अन्य काही उमेदवारांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून नावनोंदणी अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी ०८०६९०१५४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिक,विद्यार्थी आणि पालक यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन चाणक्य मंडल परिवारतर्फे करण्यात आले आहे.