मोठी बातमी: डॉ.ज्योती भाकरे यांची कुलगुरूपदी निवड

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे कुलपती अतुल चांदुरकर यांनी डॉ. ज्योती भाकरे यांची कुलगुरू पदी निवड झाली असल्याचे जाहीर केले असून याबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मोठी बातमी: डॉ.ज्योती भाकरे यांची कुलगुरूपदी निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलसचिव आणि विद्यापीठातील विधी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापिका डॉ.ज्योती भाकरे यांची नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे कुलपती अतुल चांदुरकर यांनी डॉ. ज्योती भाकरे यांची कुलगुरू पदी निवड झाली असल्याचे जाहीर केले असून याबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दीपक भागवत यांनी याबाबतचे नियुक्ती परिपत्रक जाहीर केले आहे. भाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुढील पाच वर्ष त्यांना कुलगुरू म्हणून कामकाज पाहता येणार आहे.

डॉ.ज्योती भाकरे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विभागातील विभाग प्रमुख यांनी कुलगुरू म्हणून काम करण्याची परंपरा निर्माण केली आहे.ही परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. माझ्या एकूण वाटचालीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे योगदान खूप मोठे आहे. ते पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.