NCERT ; नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय संस्कृती, एकात्मता तसेच 'POCSO' वरही धडे 

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (NCPCR) शिफारशींनुसार, NCERT ने इयत्ता पहिलीपासूनच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये POCSO कायदा आणि १०९८ चाइल्ड हेल्पलाइनचा समावेश केला आहे.  विद्यार्थी याबद्दल शिक्षक आणि पालकांशी बोलतील. यामध्ये त्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल सांगितले जाईल. याशिवाय, कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास, विद्यार्थी २४ तासांत कधीही १०९८ वर कॉल करून मदत मागू शकतो.

NCERT ; नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय संस्कृती, एकात्मता तसेच 'POCSO' वरही धडे 
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (National Council of Educational Research and Training) एनसीईआरटी नवीन पाठ्यपुस्तके तयार करताना अनेक बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञानासोबत  भारतीय संस्कृती, परंपरा आणि संगीताचीही माहिती व्हावी, या उद्देशाने ही नवीन पुस्तके बनवण्यात आली  आहेत.   इयत्ता पहिली ते आठवीच्या भाषेच्या पुस्तकांची नावे राग आणि वाद्यांवर आधारित आहेत. (The names of language books for classes 1 to 8 are based on ragas and musical instruments)  तसेच या पुस्तकांमध्ये 'POCSO' कायद्याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. (These books also provide information about the POCSO Act.)
पाठ्यपुस्तकांची सामग्री राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत तयार करण्यात आली आहे. त्यात भारतीय ज्ञान प्रणाली, सांस्कृतिक वारसा यांचे घटक देखील समाविष्ट आहेत.  इयत्ता पहिली ते पाचवीच्या भाषेच्या पुस्तकांची नावे भारतीय वाद्यांवर आधारित आहेत. तर सहावी ते आठवीच्या भाषेच्या पुस्तकांची नावे विविध लोकप्रिय रागांचे प्रतिबिंब आहेत. शालेय शिक्षण घेत असताना मुलांना भारतीय दृष्टिकोनाशी जोडणे हा त्याचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच, एनसीईआरटीने त्यांच्या सर्व नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाची प्रस्तावना आणि उद्दिष्टे समाविष्ट केली आहेत. नवीन पाठ्यपुस्तक उघडताच, विद्यार्थी संविधानाची प्रस्तावना वाचतील.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (NCPCR) शिफारशींनुसार, NCERT ने इयत्ता पहिलीपासूनच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये POCSO कायदा आणि १०९८ चाइल्ड हेल्पलाइनचा समावेश केला आहे.  विद्यार्थी याबद्दल शिक्षक आणि पालकांशी बोलतील. यामध्ये त्यांना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल सांगितले जाईल. याशिवाय, कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास, विद्यार्थी २४ तासांत कधीही १०९८ वर कॉल करून मदत मागू शकतो. 
 इयत्ता पहिली ते आठवीच्या भाषा पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना 'राष्ट्रीय एकात्मता' हा विषय शिकवला जाईल.  यामध्ये, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांमधून वेगवेगळी राज्ये, अन्न, संस्कृती, भाषा, कपडे आणि सभ्यता जाणून घेण्याची संधी मिळेल. 

२०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून, चौथीच्या विद्यार्थ्यांना एकूण पाच विषयांचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. दोन भाषांमध्ये, विद्यार्थ्यांना हिंदी, इंग्रजी किंवा उर्दू या कोणत्याही दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. शारीरिक शिक्षण किंवा योग आणि कला किंवा पर्यावरणीय शिक्षण हे एका नवीन पद्धतीने जोडले गेले आहे.