युजीसीकडून डिफॉल्टिंग विद्यापीठांची यादी जाहीर; पुण्यातील 'या' विद्यापीठाचा समावेश
राज्यात पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापना करण्याची घोषणा गेल्या पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत करण्यात आली.मात्र, अजूनही हे विद्यापीठ केवळ कागदावरच आहे.अद्याप या विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू किंवा इतर अधिकारी वर्ग नियुक्त केला गेला नाही.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commissions)वेळोवेळी सूचना देवून प्रत्येक विद्यापीठात लोकपाल नियुक्त (Lokpal appointed) करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.मात्र, देशभरातील अनेक राज्य विद्यापीठांनी, खासगी विद्यापीठांनी व अभिमत विद्यापीठांनी या सूचनांचे पालन केले नाही.त्यामुळे युजीसीने अशा डिफॉल्टिंग विद्यापीठांची यादी (List of defaulting universities)प्रसिध्द केली आहे. त्यात महाराष्ट्रातील राज्य शासनाने स्थापना केलेल्या विद्यापीठाचा समावेश आहे. युजीसीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे (International Sports University at Mhalunge-Balewadi)नाव डिफॉल्टिंग विद्यापीठांची यादीत प्रसिद्ध केले आहे.
राज्यात पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापना करण्याची घोषणा गेल्या पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत करण्यात आली.मात्र, अजूनही हे विद्यापीठ केवळ कागदावरच आहे.अद्याप या विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू किंवा इतर अधिकारी वर्ग नियुक्त केला गेला नाही.त्यामुळे पाच वर्षांपासून या विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू होऊ शकले नाही. त्यात युजीसीने सर्व विद्यापीठांना लोकपाल नियुक्तीचे आदेश दिले होते.मात्र, म्हाळुंगे-बालेवाडी येथील इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीने अद्याप लोकपाल नियुक्त केले नाहीत.त्यामुळे युजीसीने डिफॉल्टिंग विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात देशातील 19 राज्य विद्यापीठांचा समावेश असून पाच खासगी आणि 3 अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे.