जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत रजित गुप्ताने मिळवला ऑल इंडिया रँक १

CRL 1 रजित गुप्ता, CRL 2 सक्षम जिंदाल, CRL 3 माजिद मुजाहिद हुसेन, CRL 4 मंदार वर्तक, CRL 5 उज्ज्वल केसरी, CRL 6 अक्षत कुमार चौरसिया, CRL 7 साहिल मुकेश देव, CRL 8 देवेश पंकज भैया, CRL 9 अर्णव सिंग आणि CRL 10 वदलामुडी लोकेश अशी सामान्य रँक यादीत समावेश झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत रजित गुप्ताने मिळवला ऑल इंडिया रँक १

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT KANPUR) कानपूरने आज जेईई ॲडव्हान्स्डचे निकाल (JEE Advanced 2025 Results) आणि टॉपर्सची यादी जाहीर केली आहे. या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनमधील रजित गुप्ताने (Rajit Gupta from Delhi zone) ऑल इंडिया रँक (एआयआर) १ मिळवला आहे. त्याने ३६० पैकी ३३२ गुण मिळवले आहेत. अहवालांनुसार, त्याने सत्र १ आणि २ दोन्हीसाठी जेईई मेनमध्ये १०० टक्के गुण मिळवले आहेत. परीक्षेत बसलेले उमेदवार jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका तपासू शकतात.

CRL 1 रजित गुप्ता, CRL 2 सक्षम जिंदाल, CRL 3 माजिद मुजाहिद हुसेन, CRL 4 मंदार वर्तक, CRL 5 उज्ज्वल केसरी, CRL 6 अक्षत कुमार चौरसिया, CRL 7 साहिल मुकेश देव, CRL 8 देवेश पंकज भैया, CRL 9 अर्णव सिंग आणि CRL 10 वदलामुडी लोकेश अशी सामान्य रँक यादीत समावेश झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.

दरम्यान, जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ परीक्षा ही १८ मे रोजी संगणक-आधारित चाचणी (सीबीटी) स्वरूपात घेण्यात आली होती. मागील सत्र परीक्षेत, वेद लाहोटी हा ३६० पैकी ३५५ गुणांसह जेईई ॲडव्हान्स्ड टॉपर आला होता.

जेईई ॲडव्हान्स्ड निकाल २०२५ : पुढे काय?

पात्र उमेदवार आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) आणि इतर सरकारी अनुदानित तांत्रिक संस्था (GFTIs) यासारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जॉइंट सीट अ‍ॅलोकेशन (JoSAA) २०२५ कौन्सिलिंग प्रक्रियेतून पुढे जातील. JoSAA अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रमांसाठी नोंदणी आणि निवड प्रक्रिया ३ जून २०२५ रोजी सुरू होणार आहे.