PSI 2023 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; आतिष मोरे राज्यात प्रथम; अश्विनी केदारी मुलीत पहिल्या

या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील आतिष मोरे यांनी खुल्या संवर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून बुलढाणा जिल्ह्यातील चेतन राठोड यांनी मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्हयातील अश्विनी केदारी या राज्यात प्रथम आल्या आहेत.

PSI 2023 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; आतिष मोरे राज्यात प्रथम; अश्विनी केदारी मुलीत पहिल्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

MPSC Results : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट- ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI-2023)संवर्गाच्या ३७४ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील आतिष मोरे (Atish More)यांनी खुल्या संवर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून बुलढाणा जिल्ह्यातील चेतन राठोड (chetan rathod)यांनी मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच महिला वर्गवारीतून पुणे जिल्हयातील अश्विनी केदारी (ashwini kedari)या राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी परीक्षेचा निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत.

उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द  करण्यात येईल. या परीक्षेचा निकाल न्यायालयात  किंवा न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.