UPSC मार्फत उप अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ पदांसाठी अर्ज सुरू
भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मध्ये उप अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञाची (Deputy Superintendent Archaeologist) रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Start the application process) झाली असून भरतीसाठी पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर (Deadline 5th September) 2024 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे उपअधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञाच्या एकूण ६७ पदांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये 29 पदे अनारक्षित, 18 पदे ओबीसीसाठी, 6 पदे EWS, 10 पदे अनुसूचित जाती आणि 4 पदे एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. भरतीशी संबंधित इतर तपशील आणि पात्रता निकषांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC, EWS (पुरुष) श्रेणीतील उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWBD आणि महिला उमेदवार या भरतीमध्ये सामील होण्यासाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.
असा करता येणार अर्ज..
अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला विविध पदांसाठी ऑनलाइन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन (ORA) लिंकवर क्लिक करावे लागेल. आता पुढील पानावर, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञाच्या शेजारील अर्ज लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला प्रथम New Registration वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, लॉगिनद्वारे इतर तपशील भरून फॉर्म भरा. शेवटी तुम्हाला विहित शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा लागेल.