दिल्ली विकास प्राधिकरणात मेगा भरती; १ हजार ३८३ जागा भरणार
या पदांसाठी पदानुसार शैक्षणिक निकष वेगवेगळे आहेत. पात्रतेमध्ये दहावी पूर्ण करणे, आयटीआय प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रोग्राम किंवा संबंधित विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी यांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी वेतन ७ व्या केंद्रीय वेतन आयोग (CPC) चौकटीअंतर्गत स्तर १ ते ११ नुसार निश्चित केले जाते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) गट अ, ब आणि क मध्ये एकूण १ हजार ३८३ रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना (DDA Recruitment 2025) प्रसिद्ध केली आहे. रिक्त पदांमध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक विभाग अधिकारी, पटवारी (Junior Engineer, Assistant Section Officer, Patwari) आणि इतर पदांचा समावेश आहे. दहावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीपर्यंतची पात्रता असलेले उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ( 10th pass to postgraduate are eligible to apply)
सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer), स्टेनोग्राफर श्रेणी ड (Stenographer Grade D), कायदेशीर सहाय्यक (Legal Assistant), पटवारी (Patwari), नायब तहसीलदार (Naib Tehsildar), मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff ),उपसंचालक (Deputy Director), सहाय्यक संचालक (Assistant Director), कार्यक्रमकर्ता (Programmer), सर्व्हेअर (Surveyor), कनिष्ठ अनुवादक (Junior Translator), आर्किटेक्चरल असिस्टंट (Architectural Assistant), प्लॅनिंग असिस्टंट (Planning Assistant), सहाय्यक संचालक (मंत्रालय) (Assistant Director (Ministerial)), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (Assistant Security Officer) या सर्व रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.
या पदांसाठी पदानुसार शैक्षणिक निकष वेगवेगळे आहेत. पात्रतेमध्ये दहावी पूर्ण करणे, आयटीआय प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रोग्राम किंवा संबंधित विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी यांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी वेतन ७ व्या केंद्रीय वेतन आयोग (CPC) चौकटीअंतर्गत स्तर १ ते ११ नुसार निश्चित केले जाते.
या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार dda.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सादर करू शकतात. तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी आणि तुमचा अर्ज सादर करण्यासाठी, दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.