शशिकांत तिकोटे बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या राज्य संघटक पदी

शशिकांत तिकोटे हे पुण्यातील रेंजहिल्स येथील शाळेत शिक्षक असून गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील प्रश्नांबाबत मोठ्या धडाडीने काम करत आहेत.

शशिकांत तिकोटे बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या राज्य संघटक पदी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या (Bahujan Officers-Employees Federation) राज्य संघटक पदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University)माजी अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे (Shashikant Tikote)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष एस. आर. भोसले यांनी नुकतेच तिकोटे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. 

शशिकांत तिकोटे हे पुण्यातील रेंजहिल्स येथील शाळेत शिक्षक असून गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील प्रश्नांबाबत मोठ्या धडाडीने काम करत आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, यासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठाच्या आधिसभेत तिकोटे यांनीच सर्वप्रथम मांडला होता. त्यानंतर सर्व अधिसभा सदस्यांनी यावर साधक-बाधक चर्चा करून विद्यापीठाचा नामविस्तार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत तिकोटे यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रश्न मांडले आहेत. विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने करुन व निवेदने देऊन वेळोवेळी विद्यापीठाची कान उघडणी केली आहे. आता तिकोटे यांची बहुजन अधिकारी- कर्मचारी महासंघाच्या राज्य संघटक पदी निवड झाल्याने राज्यस्तरावरील बहुजन समाजाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात ते सक्रिय सहभाग घेणार आहेत.अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या अडचणीबाबत तिकोटे यांना संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. 

तिकोटे यांना संघटनेचे अध्यक्ष  एस.आर.भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी एस.ओ. तायडे, शिवाजी कांबळे, वैभव कालाखैर, संजीवन गोतपागर, अर्जुन रुपवते आदी उपस्थित होते.