शिक्षकाने विद्यार्थ्याला रागावणे, खडसावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही; सुप्रीम कोर्ट

रागावल्याने किंवा खडसावल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करेल अशी कल्पनादेखील सामान्य व्यक्ती करू शकत नसल्याचे निरीक्षण न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला व न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंदवले. भादंवि कलम ३०६ या अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून शिक्षकाला दोषमुक्त करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तो निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने हा शिक्षकाला दोषमुक्त केले आहे.  

शिक्षकाने विद्यार्थ्याला रागावणे, खडसावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही; सुप्रीम कोर्ट

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका प्रकरणात महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला रागवाणे, खडसावणे (Getting angry at a student, talking) म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले (Important observations made) आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केले (The teacher was acquitted) आहे. त्यामुळे या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

वसतिगृहातील एका विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने शाळा व वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवले होते. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर करण्यात आला होता. रागावल्याने किंवा खडसावल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करेल अशी कल्पनादेखील सामान्य व्यक्ती करू शकत नसल्याचे निरीक्षण न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला व न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंदवले. भादंवि कलम ३०६ या अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून शिक्षकाला दोषमुक्त करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तो निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने हा शिक्षकाला दोषमुक्त केले आहे.  

नेमके काय आहे प्रकरण? 

वसतिगृहातील एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षकाने तक्रारदार मुलाला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला खडसावले होते. त्यानंतर विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास २ लावून आत्महत्या केली. या प्रकरणी विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयानेदेखील शिक्षकाला दोषी ठरवले होते.