नीट युजी प्रवेशपत्र 'या' दिवशी होईल  प्रसिद्ध ; NTA ने दिली माहिती

२०२५ च्या NEET UG परीक्षेत विद्यार्थ्यांकडून एकूण १८० बहुपर्यायी (MCQ) प्रकारचे प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ३ तास ​​म्हणजेच १८० मिनिटे दिली जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना ४ गुण दिले जातील.  या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगची आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.

नीट युजी प्रवेशपत्र 'या' दिवशी  होईल  प्रसिद्ध ; NTA ने दिली माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


नीट यूजी २०२५ परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency)  एनटीएने प्रसिद्ध  केलेल्या माहितीपत्रकानुसार, (According to the published brochure) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा- पदवीधर (National Eligibility cum Entrance Examination) (नीट यूजी २०२५) साठी प्रवेशपत्रे उद्या म्हणजेच १ मे रोजी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. (Admit cards available for download tomorrow) नीट यूजी हॉल तिकीट राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर ऑनलाइन प्रसिद्ध  केले जाईल जिथून विद्यार्थी लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करून ते डाउनलोड करू शकतील. कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशपत्र वैयक्तिकरित्या पाठवले जाणार नाही.

 ही परीक्षा NTA द्वारे पेन पेपर पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. यावेळी, NEET-UG परीक्षा देशातील ५५० शहरांमधील सुमारे पाच हजार केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेची वेळ दुपारी २ ते ५ अशी असेल.

 २०२५ च्या NEET UG परीक्षेत विद्यार्थ्यांकडून एकूण १८० बहुपर्यायी (MCQ) प्रकारचे प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ३ तास ​​म्हणजेच १८० मिनिटे दिली जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना ४ गुण दिले जातील.  या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगची आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. प्रश्नपत्रिका एकूण ७२० गुणांची असेल. पेपरमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे ४५, रसायनशास्त्र विषयाचे २५ आणि जीवशास्त्र (प्राणीशास्त्र-वनस्पतिशास्त्र) या विषयाचे ९० प्रश्न विचारले जातील.

परीक्षेचे हॉल तिकीट तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता

* नीट यूजी हॉल तिकीट २०२५ जारी होताच, विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्यावी.
* वेबसाइटच्या होम पेजवर, ताज्या बातम्यांमध्ये, तुम्हाला प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करावे लागेल.
* यानंतर, विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करावे लागेल.
* आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.