नवी मुंबई महापालिका भरती : ६६८ जागांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवार रिंगणात 

नवी मुंबई महापालिकेत ६६८ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत ११ मे ऐवजी १९ मे करण्यात आली होती. पालिका इतिहासातील ही सर्वात मोठी भरती असून पालिकेतील विविध पदासाठी भरती होत असून भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २८ मार्च पासून सुरू करण्यात आली होती. भरतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

नवी मुंबई महापालिका भरती : ६६८ जागांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवार रिंगणात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई महापालिकेतपालिका (Navi Mumbai Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६६८ रिक्त पदे सरळसेवा भरती (668 vacant posts direct service recruitment) प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी १ लाख ३४ हजार ४०४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, अखेरच्या दिवसापर्यंत त्यातील ८४ हजार ७७४ उमेदवारांनी (84 thousand 774 candidates) परीक्षा शुल्क भरले आहे. त्यामुळे आता पालिकेच्या ६६८ पदांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवार रिंगणात आहेत. 

नवी मुंबई महानगर पालिकेअंतर्गत भरतीमध्ये लिपीक व टंकलेखन पदासाठी १३५ जागा असून त्यासाठी २३ हजार ३४७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाच्या ५१ जागा असून त्यासाठी १५ हजार ४४७ उमेदवार रिंगणात आहेत. कनिष्ठ अभियंता  पदाच्या ८३ जागा असून त्यासाठी १४ हजार ५५८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ पदांच्या १३१ जागा असून त्यासाठी १२ हजार ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच इतर पदांसाठी देखील उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा या भरतीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध ६६८ जागांसाठीच्या भरतीमध्ये लिपीक-टंकलेखक, लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ नर्स, कनिष्ठ अभियंता, आया, वॉर्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत. पालिकेमार्फत होणाऱ्या या भरती प्रक्रियेत बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, उद्यान अधिक्षक, उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी, वैदकीय समाजसेवक, डेंटल हायजनिस्ट, डायलिसिस तज्ञ सांख्यिकी सहाय्यक इसिजी तंत्रज्ञ, सेन्ट्रल सर्जिकल सुपरवायजर, आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, सहाय्यक ग्रंथपाल अशा विविध ३० प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेत ६६८ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत ११ मे ऐवजी १९ मे करण्यात आली होती. पालिका इतिहासातील ही सर्वात मोठी भरती असून पालिकेतील विविध पदासाठी भरती होत असून भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २८ मार्च पासून सुरू करण्यात आली होती. भरतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नवी मुंबई महापालिकेत २००८ नंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने माध्यमांना दिली आहे.