प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू; खासगी शाळांनाही नोंदणी बंधनकार
पूर्व प्राथमिकचे शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा संस्थांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असण्याच्या दृष्टीने आता शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या माहितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (National Education Policy)वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून शिक्षण देण्याच्या धोरणाचा स्वीकार करण्यात आला आहे.त्यामुळे पूर्व प्राथमिक शाळांची माहिती (Information about pre-primary schools)शासनाकडून संकलित केली जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Chief Minister Devendra Fadnavis)यांच्या हस्ते मंगळवारी महा स्कूल जीआयएस मोबाईल अॅप्लिकेशनचे (Maha School GIS Mobile Application)आणि प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलचे(Pre School Registration Portal) वर्चुअली उदघाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वयाची सहा वर्षे पूर्ण झालेल्या बालकांनाच आत्तापर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात स्थान मिळत होते. परंतु, काळानुरूप या संकल्पनेत बदल झाला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच तीन ते सहा या वयोगटातील बालकांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने हे धोरण राबवण्याची प्रक्रिया शासनाने सुरू असून सध्या महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या अंगणवाड्या बालवाड्या याबाबतची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे.
पूर्व प्राथमिकचे शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा संस्थांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असण्याच्या दृष्टीने आता शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या माहितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे, यासाठी खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाचे शिक्षण देणाऱ्या सर्व केंद्रांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याकरता वयोगट तीन ते सहासाठी शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंद करण्यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात येत असून यामध्ये बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांची सर्वसाधारण माहितीची नोंद केली जाणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीची सुविधा https://education.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर वेब लिंक्समध्ये उपलब्ध असलेल्या Pre-School Registration Portal (ECCE) या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
आपल्या पाल्याला जवळच्या आणि सर्वात चांगल्या शाळेत शालेय शिक्षण उपलब्ध करून द्यावं अशी सर्वच पालकांची इच्छा असते.,यासाठी पालकांना विविध प्रकारे शाळांचा शोध घ्यावा लागतो. भविष्यात पालकांची ही चिंता दूर होणार असून राज्यात शिक्षण देत असलेल्या शाळांच्या ठिकाणाबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून महा स्कूल जीआयएस मोबाईल ॲपच्या माध्यमातून शाळेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. पालकांना परिसरातील शाळांची संख्या, शाळेचे माध्यम तेथील सोयी सुविधा, सुरू असलेले वर्ग, शाळा कोणत्या मंडळाशी सलग्न आहे आदी माहिती आता सहज उपलब्ध होईल. तसेच शाळांच्या योग्य नियोजनासाठी शासनाला देखील याचा उपयोग करता येणार आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर म्हणजेच एम आर फॅक्ट कडून शाळांच्या छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्यासाठी महा स्कूल जीआयएस हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. शाळेची यु डायस प्लस पोर्टलमध्ये भरलेली माहिती यामध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे जीआयएस लोकेशन म्हणजेच लॅटिट्युड करून शाळेचं नाव व इमारत दिसेल, फोटो तसेच शाळेतील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी इत्यादींचे फोटो सबमिट करायचे आहेत.