CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर

देशाची युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर परीक्षा घेतल्या जातील. त्यासाठी नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.icai.org हे संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन 'आयसीएआय'चे संयुक्त परीक्षा सचिव आनंद कुमार चतुर्वेदी यांनी केले.

CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील परिस्थितीमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सनदी लेखापाल (Chartered Accountant) अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर (Exam postponed) टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात ९ ते १४ मे या तणावपूर्ण कालावधीत होणाऱ्या सीए अंतिम, इंटरमिजिएट, पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्स (CA Final, Intermediate, Post Qualification Courses) या परीक्षांचा समावेश आहे. आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.

आयसीएआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते १४ मे या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात इंटरमिजिएट परीक्षेत गट-१ ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी, इंटरमिजिएट परीक्षा ९, ११ आणि १४ मे रोजी होणार होती. तसेच, अंतिम परीक्षेतील गट-१ मधील परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर गट-२ मधील परीक्षा ८, १० आणि २३ मे रोजी घेण्याचे नियोजन होते. परंतु, देशात उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतची काळजी यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.