सावधान ! 11 वी प्रवेशासाठी फेक वेबसाईट वापरू नका ? ; शिक्षण विभागाकडून सतर्कतेचा इशारा

अनधिकृत संकेतस्थळ/डिजिटल माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा त्याआधारे प्रवेश प्रक्रिया करु नये असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.'एज्युवार्ता' सर्वप्रथम फेक वेबसाईट विषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाकडून पत्रक काढण्यात आले आहे.

सावधान ! 11 वी प्रवेशासाठी फेक वेबसाईट वापरू नका ? ; शिक्षण विभागाकडून सतर्कतेचा इशारा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात यंदापासून (सन २०२५-२६) इयत्ता अकरावीची प्रवेश ऑनलाइन (11th admission process) पद्धतीने होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अनधिकृत वेबसाईट (Unofficial website) तयार केल्या जात असून त्याद्वारे विद्यार्थी व पालकांची दिशाभूल (Misleading students and parents) करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिये संदर्भातील सर्व विद्यार्थी, पालक,शैक्षणिक संस्था/विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन यांना शिक्षण विभागाने सतर्कतेचा इशारा (Education Department issues alert) दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने अनधिकृत संकेतस्थळे (वेबसाइट) व इतर सोशल मिडिया तसेच डिजिटल माध्यमांद्वारे माहिती प्रसारित होत आहे. मात्र, अनधिकृत संकेतस्थळ/डिजिटल माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा त्याआधारे प्रवेश प्रक्रिया करु नये असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.

याबरोबरच, प्रवेशासाठी शासनाच्या https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली प्रवेश प्रक्रियेची माहिती हीच अधिकृत व विश्वासार्ह आहे. असे परिपत्रकाद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या  शिक्षण संचालकांनी सांगितले आहे. 

दरम्यान शिक्षण विभागातर्फे https://mahafyjcadmissions.in अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी काही व्यक्तींनी राज्य शासनाच्या लोगोचा व शालेय शिक्षण मंत्र्यांच्या छायाचित्रांचा वापर करून एक बनावट संकेतस्थळ तयार केले. त्यात काही महाविद्यालयांची जाहिरात केली. त्यावर शिक्षण विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु,अद्याप शिक्षण विभागाकडून याबाबत कठोर भूमिका घेण्यात आलेली नाही.