गोळवलकर गुरुजी विद्यालयाची विद्यार्थीनी गीता धनावडे गिरवणार इस्रोतून धडे

इस्रोतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गीताने संपूर्ण देशात सहावा क्रमांक पटकाविला.

गोळवलकर गुरुजी विद्यालयाची विद्यार्थीनी गीता धनावडे गिरवणार  इस्रोतून धडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील नामांकित डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस- DES) माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची (Golwalkar Guruji Vidyalaya)विद्यार्थिनी गीता धनावडे (Geeta Dhanave)हिची इस्रो प्रशिक्षणासाठी(ISRO training)निवड झाली आहे.

इस्रोच्या 'युविका 2024' या कार्यक्रमाअंतर्गत तिची निवड करण्यात आली. त्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गीताने संपूर्ण देशात सहावा क्रमांक पटकाविला.अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (एसएसी) येथे 12 ते 24 मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी गीताच्या यशाबद्दल तिचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

गीताने राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात विजेतेपद मिळविले असून राज्यस्तरीय ऑलिंम्पियाड स्पर्धेत ही विजेतेपद प्राप्त केले. तसेच  गीता  जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेची विजेती आहे.