LLB 5 वर्ष CET ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, 'ही' अंतिम तारीख

इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी १५ एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात.

LLB 5 वर्ष CET ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, 'ही' अंतिम तारीख

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (Maharashtra State Common Entrance Test) कक्षाकडून MAH LLB 5 वर्षांच्या CET साठी नोंदणी करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी १५ एप्रिलपर्यंत (Extension till 15th April) अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत  देण्यात आली होती. 

उमेदवार व पालकांकडून विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार लक्षात घेवून महा-एल.एल.बी (५ वर्ष) सीईटी २०२४ साठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सीईटी सेलने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

MAH LLB 5 वर्षे CET 2023 परीक्षा नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च देण्यात आली होती, आता ती १५ दिवसांनी वाढवून १५ एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. तर दोन दिवसांपुर्वीच्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा १८ मे रोजी  घेण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी cetcell.mahacet.org संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी. खुल्या प्रवर्गातील, महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील EWS श्रेणीतील उमेदवार, सर्व श्रेणीतील भारतीय उमेदवार आणि जम्मू-काश्मीर मधील स्थलांतरितांसाठी अर्ज शुल्क 1 हजार रुपये आहे.

अर्ज कसा करावा

सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. होम पेजवर दिलेला MAH LLB 5 वर्षे CET 2023 टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन उमेदवारांना नोंदणी करावी लागेल तर इतरांना पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.