स्टाफ सिलेक्शन कमिशन २०२५-२६ या वर्षातील परीक्षांचे कॅलेंडर जाहीर
एसएससीने २०२५-२०२६ या वर्षासाठी विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी नवीन वार्षिक परीक्षा कॅलेंडर केले प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, जेई, सिलेक्शन पोस्ट, दिल्ली पोलिस आणि सीएपीएफमधील सब-इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर, जीडी कॉन्स्टेबल यासारख्या आदी पदांचा समावेश आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) येत्या २०२५-२६ या वर्षाचे परीक्षा कॅलेंडर २०२५ (SSC Exam Calendar 2025) प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://ssc.gov.in वर जाऊन हे सविस्तर कॅलेंडर पाहाता येणार आहे. ज्यामध्ये २०२५-२०२६ या वर्षासाठी येणाऱ्या सर्व एसएससी परीक्षांचे वेळापत्रक आहे. एसएससीने २०२५-२०२६ या वर्षासाठी विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी नवीन वार्षिक परीक्षा कॅलेंडर केले प्रसिद्ध (New annual exam calendar released) आहे. ज्यामध्ये सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, जेई, सिलेक्शन पोस्ट, दिल्ली पोलिस आणि सीएपीएफमधील सब-इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर, जीडी कॉन्स्टेबल यासारख्या आदी पदांचा समावेश आहे.
दरवर्षी २० लाखांहून अधिक अर्जदार १०वी, १२वी किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर भारतीय सरकारी नोकरीच्या शोधात या परीक्षा देतात आणि एसएससी त्यांना त्यांची तयारी कार्यक्षमतेने नियोजन करण्यास मदत करण्यासाठी आधीच कॅलेंडर जाहीर केले जाते. एसएससी सीजीएल, सीएचएसएल, सीपीओ, सिलेक्शन पोस्ट, स्टेनोग्राफर, जेई आणि एमटीएस परीक्षांच्या अचूक तारखा वार्षिक एसएससी कॅलेंडर २०२५-२६ सोबत देखील सूचित केल्या आहेत.
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्याच्या तारखा जाणून घेतल्यास अभ्यासक्रम त्यानुसार पूर्ण करण्याची कल्पना येते. एसएससी कॅलेंडर २०२५ च्या प्रकाशनासोबतच, आयोगाने एसएससी परीक्षा कधी घेता येतील याचीही तात्पुरती तारीख जाहीर केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या संख्येनुसार एसएससी परीक्षा अनेक दिवसांत घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.