फर्ग्युसन,एसपी, गरवारे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बीए आणि बी.एस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला ६ मेपासून सुरुवात झाली आहे . त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १७ मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी १९ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) नुकताच ५ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर (Class 12th results announced) करण्यात आला आहे. त्यानंतर आता लगेच पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला काही महाविद्यालयांनी सुरुवात (Degree admission process begins) केली आहे. पुण्यातील नामांकित फर्ग्युसन, गरवारे, एसपी (Ferguson, Garware, SP College Admission Process) यांसारख्या काही महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करावे लागणार आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बीए आणि बी.एस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला ६ मेपासून सुरुवात झाली आहे . त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १७ मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी १९ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच २१ रोजी अर्जामध्ये दुरूस्ती करण्याची विंडो ओपन केली जाईल. तर २२ मे रोजी पहिली फायनल मेरिट लिस्ट बोर्डावर लावली जाईल.
एसपी महाविद्यालयाच्या बीए आणि बी. एस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी अर्जासाठी सुरुवात झाली झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २० मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी २२ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच महाविद्यालयाची अंतिम गुणवत्ता यादी ही २४ मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया ही ३० मेपर्यंत राबवली जाईल.
अन्नासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या बीए आणि बी. एस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी अर्जासाठी सुरुवात झाली झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २८ मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी २ जुन रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच महाविद्यालयाची अंतिम गुणवत्ता यादी ही ४ जुन रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया ही ६ जुनपर्यंत राबवली जाईल.