टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, राज्यातील १७५ परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा

संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांना त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध होणार आहे. हे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्या वर, संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्यावर विद्यार्थ्यांचा अद्यावत फोटो आणि संस्थेचा शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षाथ्यांना त्वरीत वितरीत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, राज्यातील १७५ परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे (Maharashtra State Examination Council) मार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (Computer Typing Certificate Examination) (GCC-TBC) येत्या 11 जून 2025 पासून (मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि.) ऑनलाईन पध्दतीने राज्यातील एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर (Examination at 175 examination centers) घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनव्दारे प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.

संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांना त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध होणार आहे. हे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यावर संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्यावर विद्यार्थ्यांचा अद्यावत फोटो आणि संस्थेचा शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षाथ्यांना त्वरीत वितरीत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणं सदर परीक्षांसाठी प्रवेशपत्र वितरीत केल्यानंतर विद्याथ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल यासह अन्य कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करुन दिली जाणार नसल्याची ताकिद देण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरुस्ती असेल व विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव/ पत्तीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल तर सदर दुरुस्ती या कार्यालयाच्या  www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ऑनलाईन लिंकद्वारे २०० रुपये दंड आकारुन करता येईल.

सर्व परीक्षाध्यर्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावित परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही, नसल्याचे परीक्षा परिषदेने म्हटले आहे.