बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

विद्यार्थ्यांना बुधवार दि. ७ मे पासून ते शुक्रवार १७ मे २०२५ या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. तर १८ मे ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (State Boards of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (Failed students) शिक्षण मंडळाकडून जुन-जुलै २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ७ मे ते १७ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार (Application can be filled online) आहे. 

पुरवणी परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरायचा आहे. या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत. 

विद्यार्थ्यांना बुधवार दि. ७ मे पासून ते शुक्रवार १७ मे २०२५ या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. तर १८ मे ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख  २३ मे पर्यंत देण्यात आली आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख २६ मे आहे.