मुंबई मनपा भरती : दुय्यम अभियंता परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील थेट भरतीसाठीची नियोजित परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार १३ आणि १४ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.  

मुंबई मनपा भरती : दुय्यम अभियंता परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दुय्यम अभियंता (Secondary Engineer Examination) (स्थापत्य) संवर्गाची परीक्षा यापूर्वी ९ मार्च २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजित करण्यात आले  होती. मात्र, काही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर (Exam admit card announced) झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील थेट भरतीसाठीची नियोजित परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार १३ आणि १४ मे २०२५ रोजी (Exam on 13th and 14th May 2025) घेण्यात येणार आहे.  

दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाची ऑनलाइन परीक्षा १३ आणि १४ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घेणे अपेक्षित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) आणि उप अभियंता (सिव्हिल / एम अँड ई) पदांची भरती संवर्गातील पदे भरण्याकरिता घेण्यात येणार्‍या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपले प्रवेशपत्र https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

नमूद कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे. उमेदवारांनी याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच, सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेश पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/forprospects / Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र, एक फोटो,  ज्यावर स्वतः स्पष्ट दिसेल असा फोटो असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे.