मुंबई विद्यापीठाकडून  20 नवीन उद्योग-एकात्मिक पदवी कार्यक्रम सुरू 

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, सर्व बिगर-कृषी सार्वजनिक विद्यापीठे आणि पात्र संलग्न महाविद्यालयांमध्ये एईडीपी लागू करण्यासाठी  महाराष्ट्र सरकारने अलिकडेच मान्यता दिली होती. त्यानंतर  हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाकडून  20 नवीन उद्योग-एकात्मिक पदवी कार्यक्रम सुरू 

एज्युवार्ता न्यूज  नेटवर्क 

 मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) एमयू  २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून २० पदवीपूर्व अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) सुरू करण्याची घोषणा केली. (Announced the launch of 20 undergraduate Apprenticeship Embedded Degree Programmes) विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट मार्फत देण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये उद्योग भागीदारांच्या सहकार्याने अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा समावेश असेल. 

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, सर्व बिगर-कृषी सार्वजनिक विद्यापीठे आणि पात्र संलग्न महाविद्यालयांमध्ये एईडीपी लागू करण्यासाठी  महाराष्ट्र सरकारने अलिकडेच मान्यता दिली होती. त्यानंतर  हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावात विद्यापीठांना २०२५-२६ पासून AEDP कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्याचे आणि पहिल्या वर्षात किमान ३०० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

एमयूच्या  पेंट टेक्नॉलॉजी, फिटनेस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग, एरोनॉटिक्स आणि बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन सायन्समध्ये बी.एससी, इंटीरियर डिझाइनमध्ये बॅचलर, कम्युनिकेशन आणि डिझाइनमध्ये बीए, कस्टम्स क्लिअरन्स आणि लॉजिस्टिक्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन्ससह अनेक बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) स्पेशलायझेशन्स अशा उद्योग-केंद्रित पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. 

यातील प्रत्येक कार्यक्रम प्रतिष्ठित औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थांसोबत भागीदारीत चालवला जाईल आणि त्यात अनिवार्य अप्रेंटिसशिप प्रशिक्षण समाविष्ट असेल. तीन वर्षांच्या पदवी कार्यक्रमांमधील विद्यार्थी किमान एक सेमिस्टर (२० क्रेडिट्स) अप्रेंटिसशिप पूर्ण करतील, तर चार वर्षांच्या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी दोन सेमिस्टर (४० क्रेडिट्स) ऑन-द-जॉब प्रशिक्षण घेतील. सहभागींना त्यांच्या अप्रेंटिसशिप दरम्यान स्टायपेंड देखील मिळेल आणि NEP २०२० च्या क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत शैक्षणिक क्रेडिट्स दिले जातील.