दहावीचा निकाल केव्हा; राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबाबत स्पष्ट सांगितले आहे. राज्य मंडळातर्फे निकालाची तयारी सुरू असून निकाल येत्या 15 मे पूर्वी जाहीर केला जाणार आहे.

दहावीचा निकाल केव्हा; राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. बारावीनंतर आता दहावीच्या निकाल (10th class results) केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. त्यावरच राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाबाबत स्पष्ट सांगितले आहे. राज्य मंडळातर्फे निकालाची तयारी सुरू असून निकाल येत्या 15 मे पूर्वी जाहीर (10th class results to be declared before May 15) केला जाणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी ही कागदपत्र काढली का ? ऑनलाईन प्रवेशासाठी आवश्यक

राज्य मंडळातर्फे यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा काही दिवस आधी घेण्यात आल्या.त्यामुळे यंदा बारावीचा निकाल सुमारे 17 दिवस आधी जाहीर झाला.त्यामुळे दहावीचा निकालही लवकर जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यापूर्वीच दहावी- बारावीचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बारावीचा निकाल लवकर जाहीर झाला आहे. आता दहावीचा निकालही 9 मे पूर्वी किंवा 13 ते 15 मे तारखेला दरम्यान जाहीर केला जाऊ शकतो.

संतोष देशमुखांच्या लेकीला बारावीत घवघवीत यश, संपूर्ण महाराष्ट्राचं जिंंकलं मन

निकाल जाहीर करण्यासाठी काही डिजी लॉकर सारख्या शासकीय ऑनलाईन सुविधांचा वापर करण्यात आला आहे. परंतु, सुट्टीच्या दिवशी या सुविधांवर निकाल जाहीर करण्यास काही अडचणी येतात. त्यामुळे दहावीचा निकाल 9 मे पूर्वी जाहीर केला जाऊ शकतो.