विद्यापीठाच्या PHD पेट परीक्षेला युजीसीकडून मिळेना हिरवा कंदील 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केलेल्या पत्रव्यवहाराला अद्याप उत्तर मिळाले नाही.

विद्यापीठाच्या PHD पेट परीक्षेला युजीसीकडून मिळेना हिरवा कंदील 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (University Grants Commissions)पीएच.डी.प्रवेशाबाबत (Admission to Ph.D)नवनवीन निर्णय जाहीर केले जात असल्याने पीएच.डी.प्रवेशास इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.मात्र,पीएच.डी.प्रवेशसाठी पेट परीक्षा (PET EXAMINATION FOR ADMISSION TO Ph.D)घेण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University)विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केलेल्या पत्रव्यवहाराला अद्याप उत्तर मिळाले नाही.त्यामुळे युजीसी विद्यापीठाच्या पेट परीक्षेला हिरवा कंदील (green signal )दाखवणार की नेट परीक्षेच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना करणार यावरून विद्यापीठातील अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी नियमावलीत बदल केले असून पीएच.डी.प्रवेश प्रक्रियेची पूर्ण तयारी केली आहे.मात्र,नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश देण्याची घोषणा केल्यामुळे विद्यापीठाने पेट परीकक्षा घेण्याबाबत युजीसीकडे पत्रव्यवहार केला.परंतु, सुमारे 15 दिवस उलटून गेले तरी युजीसीकडून विद्यापीठाला उत्तर मिळाले नाही.त्यामुळे विद्यापीठाची पेट परीक्षा रखडली असून विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.तसेच युजीसीकडून पत्राला केव्हा उत्तर मिळणार याकडेही अधिकारी डोळे लाऊन बसले आहे.

विद्यापीठाला पेट परीक्षा घेण्याची परवानगी मिळाली तर पुढील एक दोन महिन्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होईल.मात्र, युजीसीने नेट परीक्षेच्या आधारेच प्रवेश देण्याबाबत आदेश दिले तर विद्यार्थ्यांना येत्या जून महिन्यात होणारी नेट परीक्षा द्यावी लागेल.त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाच्या आधारे जुलै-ऑगस्ट महिन्यात विद्यापीठाला पीएच.डी प्रवेश प्रक्रिया राबवणे भाग पडेल.परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी तीन ते चार महिने वाट पहावी लागेल.त्यामुळे युजीसी पेट परीक्षेबाबत काय निर्णय देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--------------------------------------------------------