मुद्रांक शुल्क विभागात भरती; २८४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (Government job opportunities) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील (Registration and Stamps Department) शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० मे २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.
मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकृत संकेतस्थळ igrmaharashtra.gov.in यावर उमेदवार अर्ज भरू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत शिपाई (गट-ड) संवर्गातील एकुण २८४ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे ते कमाल मर्यादा ३८ वर्षांपेक्षा जास्त असू नये. मागासवर्गीय/ खेळाडू/ दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ इतकी असणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १ हजार रुपये अर्ज शुल्क आकारला जाणार आहे तर इतर राखीव वर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. ही भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे. भरती विषयी अधिकचा तपशील माहिती करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० मे २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.