बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला पकडले 58 कॉपी बहाद्दर 

छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात 26, पुणे विभागीय मंडळात 15 ,लातूर विभागीय मंडळात 14 ,नाशिक विभागीय मंडळात २ तर लातूर विभागीय मंडळात १ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले.

बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला पकडले 58 कॉपी बहाद्दर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत (12th Exam) आज पासून सुरुवात झाली. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला राज्यात तब्बल 58 कॉपी (copy cases)बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली.सर्वाधिक कॉपी बहाद्दर छत्रपती संभाजी नगर येथे पकडले असून मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभागात परीक्षेदरम्यान एकही गैरप्रकार आढळून आला नाही.

राज्य मंडळाच्या अंतर्गत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळाच्या माध्यमातून इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य मंडळातर्फे अभियान  राबविण्यात आले. मात्र तरीही पहिल्याच पेपरला 58 विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळून आले.

राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात 26, पुणे विभागीय मंडळात 15 ,लातूर विभागीय मंडळात 14 ,नाशिक विभागीय मंडळात २ तर नागपूर विभागीय मंडळात १ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले . या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे