बोर्डाच्या परीक्षांना अहंकाराचा मुद्दा बनवू नका, विद्यार्थ्यांना छळू नका : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकरला सुनावले
कर्नाटक सरकार जे शिक्षणाचे मॉडेल फॉलो करत आहे ते इतर कोणतेही राज्य फॉलो करत नाही. कोणत्याही जिल्ह्यात इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी साठी सहामाही परीक्षा घेतली गेली नसेल तर ती आता घेऊ नये', असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'वेगवेगळ्या वर्गांसाठी बोर्ड परीक्षा आयोजित करून तुम्ही विद्यार्थ्यांचा छळ का करत आहात? तुम्ही राज्य आहात. तुम्ही असे वागू नका. याला अहंकाराचा मुद्दा बनवू नका,' अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले आहेत. (Restrains The Karnataka government) काही वर्षांपासून कर्नाटकात इयत्ता 5 वी, 8 वी, 9 वी आणि 10 वी या चार वर्गांसाठी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात. (Board exams are conducted for classes 5th, 8th, 9th and 10th.)पण मागील काही महिन्यांपासून कर्नाटक राज्यात हा वादाचा मुद्दा बनला आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने कर्नाटक सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांना सांगितले की, "तुम्ही विद्यार्थ्यांचा छळ का करत आहात? तुम्ही राज्य आहात. तुम्ही असे वागू नका. याला अहंकाराचा मुद्दा बनवू नका. जर तुम्हाला मुलांच्या कल्याणाची काळजी असेल तर कृपया चांगल्या शाळा उघडा आणि त्यांची गळचेपी करू नका"
'कर्नाटक सरकार जे शिक्षणाचे मॉडेल फॉलो करत आहे ते इतर कोणतेही राज्य फॉलो करत नाही. कोणत्याही जिल्ह्यात इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी साठी सहामाही परीक्षा घेतली गेली नसेल तर ती आता घेऊ नये', असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील 3 ग्रामीण जिल्ह्यांतील इयत्ता 5, 8 आणि 9 वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.