बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार
आरोपींनी पीडित तरुणीचा बलात्कार करून तिला खडी मशीन चौकात सोडले होते. त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील (Pune)एका महाविद्यालयात सुरत येथून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape of young woman) झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री बोपदेव घाटात (Bopdev Ghat) फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणीवर अनोळखी व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता पुण्यात विद्यार्थिनींवर सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या व बलात्काराच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी बोगदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीचे कारमधून अपहरण करण्यात आले. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित तरुणीला सोडून आरोपी पळून गेले होते. मात्र, आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
आरोपींनी पीडित तरुणीचा बलात्कार करून तिला खडी मशीन चौकात सोडले होते. त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील वाडिया कॉलेजमधील विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर वानवडी परिसरातील दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. त्यातच आता बोगदेव घाटात सुरत येथून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी निवड सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे, त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.