सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जेएनयू'पेक्षाही डावे; कुलगुरू डॉ.शांतीश्री पंडीत यांचे विधान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जेएनयूपेक्षाही डावे असल्याचो वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू डॉ शांतिश्री पंडीत यांनी मोठे विधान केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जेएनयू'पेक्षाही डावे; कुलगुरू डॉ.शांतीश्री पंडीत यांचे विधान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) 'जेएनयू'पेक्षाही डावे असल्याचे वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू डॉ.शांतीश्री पंडीत (JNU Vice Chancellor Dr. Shantisree Pandit) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्या म्हणाल्या, ‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगलं काम करू शकले,’ असंही त्यांनी यावेळी सांगितले.

'जेएनयू'ने आयआयएम, आयआयटींना क्रमवारीत मागे टाकले आहे. 'जेएनयू'ला सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून दिलेली मी पहिली 'संघी' आहे. अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून पदे मिळवतात आणि नंतर लपवाछपवी करतात. पण, 'मी उघडपणे सांगते, मी संघाची' आहे, मी राष्ट्रसेविका समितीची आहे,' असेही त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृति व्याख्यानात ‘नव्या युगातील भारतीय समाज : संधी आणि आव्हाने’ या विषयावर बोलताना पंडीत यांनी हे वक्तव्य केले आहे. 

जेएनयूच्या कुलगुरू डॉ शांतिश्री पंडीत म्हणाल्या, ‘डाव्यांचे कथन अतिशय मजबूत आहे. डावे लोकच क्रांतिकारी असू शकतात, असे आजपर्यंत पुढे आणण्यात आले. मात्र, वासुदेव बळवंत फडकेही क्रांतिकारक होते, हे लोकांसमोर आणले गेले पाहिजे. पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरातून हे कथन सुरू झाले पाहिजे. त्यासाठी लेखन करावे लागेल, बोलावे लागेल. स्वातंत्र्य चळवळ अहिंसक होती, हे दाखविण्यासाठी क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असेपर्यंत त्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा हा अपमान होता, असेही जेएनयूच्या कुलगुरू डॉ.शांतीश्री पंडीत म्हणाल्या.