प्रियदर्शनी स्कूलचा दिल्लीत फडकणार झेंडा ; श्रावणी सस्ते हिची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड
श्रावणी सस्ते हिला आता नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी प्रियदर्शनी स्कूलच्या वतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा देण्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या प्रियदर्शनी स्कूलचे (Priyadarshani School) विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करत आहेत. पुण्यातील मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलची (Priyadarshani School in Moshi) इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी श्रावणी सस्ते हिने कराटे स्पर्धेत (Shravani saste karate tournament) घवघवीत यश संपादन केले आहे. श्रावणी सस्ते हिला आता नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी प्रियदर्शनी स्कूलच्या (Priyadarshani School for National Karate Competition) वतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
प्रियदर्शनी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. त्यांच्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. श्रावणी सस्ते हिला शाळेकडून कराटे स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तिने धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत (१७ वर्षांखालील मुलींच्या गटात, वजन गट ६८- ७२ किलोग्रॅम) विजेतेपद मिळवले. त्यानंतर आता तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेत श्रावणी शाळेच्या वतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
श्रावणी सस्ते हिच्या यशाबद्दल निरंकारी एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नरेंद्र सिंह, प्राचार्या आशा रेड्डी, रझिया लखानी,पालक, शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रावणीला शुभेच्छा दिल्या आहेत.