धक्कादायक; 'त्या' पाकिस्तानी महिला भारतीय शाळांच्या शिक्षिका
ऑक्टोबर २०२४ मध्ये शुमायला खान यांना पदावरून काढून टाकण्यात आले. तिची चौकशी सुरू असताना आता असे समोर आले आहे की २०२२ मध्ये शुमयलाच्या आईलाही मूलभूत शिक्षण विभागाने शिक्षिका पदावरून काढून टाकले होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक अनधिकृत रित्या भारतात प्रवेश करून इथल्या नागरिकांप्रमाणे वास्तव्य करत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. पण आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथून आलेल्या एका माहितीमुळे संपूर्ण शिक्षण विभाग गोंधळात पडले आहे. उत्तर प्रदेशातील एका शाळेत पाकिस्तानी महिला शिक्षिका म्हणून कित्येक वर्षापासून काम करत होती. आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षापूर्वी तिच्या आईलाही नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.
मीडिया रीपोर्टनुसार, पाकिस्तानी महिला शुमैला खान (Pakistani woman Shumaila Khan) २०१५ पासून उत्तर प्रदेशातील बरेली येथील सरकारी प्राथमिक शाळा माधोपूरमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत होती. (She was working as an assistant teacher at Madhopur, a government primary school in Bareilly) तीने नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. या घटनेमुळे राज्यातील शिक्षण विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये शुमैला खान यांना पदावरून काढून टाकण्यात आले. तिची चौकशी सुरू असताना आता असे समोर आले आहे की, २०२२ मध्ये शुमैलाच्या आईलाही मूलभूत शिक्षण विभागाने शिक्षिका पदावरून काढून टाकले होते. खरंतर, शुमैला खानची आई फरजाना हिचे माहेरचे घर रामपूरच्या मोहल्ला आतीशबाजन येथे आहे. १९७९ मध्ये तिने पाकिस्तानच्या सिबगत अलीशी लग्न केले. लग्नानंतर फरजाना पाकिस्तानला गेली आणि तिथली नागरिकत्व तिला मिळाले. दोन वर्षांनी, फरझानाचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाला. त्यावेळी शुमैला खान सुमारे दोन वर्षांची होती. आई फरजाना, शुमैला आणि तिची धाकटी बहीण अलिमा यांच्यासोबत रामपूर येथील तिच्या माहेरी परतली. भारतात येताना फरजाना हिने पाकिस्तानी पासपोर्टवर व्हिसा मिळवला होता. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही फरजाना पाकिस्तानात परतली नाही तेव्हा १९८३ मध्ये रामपूरमध्ये तिच्याविरुद्ध खटला दाखल झाला होता. पण काही वर्षानी हे प्रकरण थंडावले.
२२ जानेवारी १९९२ रोजी फरजाना मूलभूत शिक्षण विभागात शिक्षिका झाली. हे प्रकरण सरकारपर्यंत पोहोचले पण तपास दाबण्यात आला. २०२२ मध्ये एक नवीन चौकशी करण्यात आली. सरकारच्या सूचनेनुसार, मूलभूत शिक्षण विभागाने तथ्य लपवून काम केल्याच्या आरोपाखाली फरजानाला बडतर्फ करण्यात आले होते. शुमैलाचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि तिच्या आईला पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळू शकले नव्हते, त्यामुळे फरझानालाही भारतीय नागरिकत्व मिळू शकले नाही. शुमैला खान हिच्या अटकेची तयारी सुरू असून सध्या तिच्या पगारचा परतावा घेण्याचे काम सुरू आहे.