CBSE बोर्डाकडून शाळांची अचानक तपासणी,  नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई..

या तपासणीचा उद्देश बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा सीबीएसईने ठरवून दिलेल्या नियमांचे आणि उपनियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही याची खात्री करणे हा आहे.

CBSE बोर्डाकडून शाळांची अचानक तपासणी,  नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा नियमांचे पालन करत आहेत, याची खात्री करण्यासाठी राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांमध्ये अचानक तपासणी (A surprise inspection of schools) केली आहे. तपासणी दरम्यान बोर्डाचे नियम पाळत नसल्याचे आढळणाऱ्या शाळांवर कारवाई (Action will be taken against the schools found not following the rules of the board) करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आहे. मिडीया रिपोर्टनुसार,  या तपासणीचा उद्देश बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा सीबीएसईने ठरवून दिलेल्या नियमांचे आणि उपनियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही याची खात्री करणे हा आहे. या तपासणीच्या निष्कर्षांचे सर्वसमावेशकपणे पुनरावलोकन केले जाईल आणि त्याचे पालन न झाल्यास शाळेवर योग्य ती कारवाई केली जाईल.

या सर्व 27 शाळांमध्ये 27 टीम तयार करून आकस्मिक तपासणी केली आहे. या टीममध्ये प्रत्येकी एक CBSE अधिकारी आणि CBSE-संलग्न शाळेतील मुख्याध्यापक यांचा समावेश होता. तपासणी काळजीपूर्वक नियोजित आणि समक्रमित पद्धतीने अंमलात आणली गेली आहे. ही आकस्मिक तपासणी अत्यंत कमी कालावधीत निवडलेल्या शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात आली असून, शाळांच्या कामकाजाबाबत आणि अनुपालनाबाबत दिलेली माहिती योग्य आहे की नाही, याची खातरजमा करण्यात आली. या तपासणीच्या निष्कर्षांचा सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल.

संलग्न शाळा त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरपणे पालन करतील , शी अपेक्षा बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सीबीएसईने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई केली जाईल. CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड संलग्नित शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि भविष्यात ते आकस्मिक तपासणी करत राहतील जेणेकरून संलग्न शाळांची अपेक्षित गुणवत्ता कायम राखली जाईल.