सीईटी सेल : संस्था स्तरावरील नियमबाह्य प्रवेशाची चौकशी; 'पीआयसीटी'च्या प्रवेश प्रक्रियेची तपासणी

माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 13 नुसार सर्व शैक्षणिक संस्थांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश करणे बंधनकारक असून त्याची काटेकोरपणे प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही, याचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी तंत्र शिक्षण संचालक कार्यालयाकडे दिली आहे.

सीईटी सेल : संस्था स्तरावरील नियमबाह्य प्रवेशाची चौकशी; 'पीआयसीटी'च्या प्रवेश प्रक्रियेची तपासणी

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell) (सीईटी सेल -CET CELL) प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीप्रमाणेच संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 13 नुसार संस्था स्तरावरील प्रवेश (Institutional Admission) प्रक्रिया राबवली आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.त्यात नियम डावलून प्रवेश दिले असल्याचे आढळून आल्यास संबंधित प्रवेश रद्द केले जातील, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई (Commissioner Dilip Sardesai) यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले. तसेच पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून त्यानुसार पीआयसीटीने (PICT) राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेची तपासणी केली जाणार आहे, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. 

व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियमावलीनुसार राबविणे आवश्यक आहे. परंतु पुण्यातील काही शैक्षणिक संस्था नियम डाउनलोड संस्था स्तरावरील प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात युवा सेनेचे सरचिटणीस कल्पेश यादव यांनी सीईटी सेलकडे लिखित तक्रार दिली होती.त्यावर सीईटी सेलन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 13 नुसार सर्व शैक्षणिक संस्थांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश करणे बंधनकारक असून त्याची काटेकोरपणे प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही, याचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी तंत्र शिक्षण संचालक कार्यालयाकडे दिली आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेले प्रवेश रद्द केले जातील, असे या पत्रकात नमूद केले आहे.

कॅल्पेश यादव म्हणाले, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी अर्थात पीआयसीटी या संस्थेने संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया नियम डावलून केली असल्याचे दिसून आले आहे. त्या संदर्भातील सर्व पुरावे सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. त्याचप्रमाणे पुणे शहरासह राज्यभरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी संस्था स्थरावरील प्रवेश प्रक्रिया राबवताना नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्याचे निर्देश परिपत्रकाद्वारे सीईटी सेलने तंत्र शिक्षण विभागाला दिले आहेत.विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट थांबावी, या उद्देशाने सर्व प्रवेश नियमाप्रमाणे होणे गरजेचे आहे.

-----------

सर्व शैक्षणिक संस्थांनी सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, यासंदर्भात माहिती पुस्तिकेत सविस्तर नियम दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रवेश नियमानुसार होतील, या संदर्भात काळजी घ्यावी, असे लेखी पत्र प्रत्येक संस्थेच्या प्राचार्यांना देण्यात आले आहे.

- दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल