BIS द्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध, ९ सप्टेंबरपासून अर्ज सुरू 

ब्युरो ऑफ इंडियन  स्टँडर्ड द्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://www.bis.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर 9 सप्टेंबरपासून अर्ज करू शकतील.

BIS द्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध, ९ सप्टेंबरपासून अर्ज सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ब्युरो ऑफ इंडियन  स्टँडर्ड (BIS) द्वारे विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://www.bis.gov.in/ वर 9 सप्टेंबरपासून अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30  सप्टेंबर (Deadline September 30) देण्यात आली आहे. 

बीआयएस भरतीसाठी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील देण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. याअंतर्गत ग्रुप ए, बी आणि सी ची पदे भरले जाणार आहेत. यात असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सिनियर आणि ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (लेबोरीट्री) आणि सिनियर टेक्निशियन यांसारखी 325 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता ही पदानुसार वेगवेगळी असेल. या पदांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे.असिस्टंट डायरेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित फिल्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे.पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला स्टेनोग्राफी येणे आवश्यक आहे. यासंदर्भातील सविस्तर तपशील अधिसूचनेत देण्यात आला आहे.

बीआयएस भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया विविध टप्प्यातून होणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेश आणि वैद्यकीय चाचणी हे टप्पे असतील.