ना परीक्षा, ना मुलाखत; CCL मध्ये तरुणांना डायरेक्ट नोकरीची संधी.. 

अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार CCLचे अधिकृत संकेतस्थळ nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर आहे. 

ना परीक्षा, ना मुलाखत; CCL मध्ये तरुणांना डायरेक्ट नोकरीची संधी.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL) मध्ये ना परीक्षा, ना मुलाखत घेता उमेदवारांची डायरेक्ट निवड केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू (Start the application process) झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार CCLचे अधिकृत संकेतस्थळ nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर (Deadline 21 September) आहे. 

CCL ने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेन्टिसच्या पदांचा विचार केला जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही देखील या भरती प्रक्रियेच्या मार्फत CCL मध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छित असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची मुदत २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. या तारखेनंतर करण्यात आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नसल्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकर अर्ज नोंदवण्याचे आवाहन CCL ने केले आहे.

अधिसूचनेमध्ये CCL ने शिक्षण तसेच वयोमयदिविषयक अटी तसेच शर्ती नमूद केल्या आहेत. त्यानुसार, या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवाराने दहावी तसेच बारावी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर, कामाच्या संबंधित क्षेत्रात ।T। किंवा डिप्लोमा पूर्ण असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर काही पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचे बीकॉम किंवा खनन अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. 

या अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ असावे, तर कमाल वयोमार्यादा २२ ते २७ वर्षे इतकी आहे. या वयोगटामध्ये बसणाऱ्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येत असलेल्या उमेदवारांना वयोमयदिमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाईल. या निवड प्रकियेमध्ये, कोणत्याही उमेदवाराची लिखित परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नसून शैक्षणिक पात्रता तसेच इतर बाबी लक्षात घेऊन निवड केली जाईल.