सीए इंटर आणि फायनल परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध 

उमेदवारांना प्रवेशपत्रावर असलेली त्यांची वैयक्तिक माहिती (नाव, परीक्षा केंद्र, रोल नंबर इ.) काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास ताबडतोब ICAI शी संपर्क साधा, अशी सूचना इंस्टीट्यूट ने दिली आहे. 

सीए इंटर आणि फायनल परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


चार्टर्ड अकाउंटन्सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) ICAI ने मे २०२५ मध्ये होणाऱ्या सीए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेसाठी प्रवेशपत्रे प्रसिद्ध  केली आहेत. (Admit cards released for CA Intermediate and Final exams) आता या परीक्षेसाठी नोंदणी केलेले सर्व उमेदवार ICAI eservices.icai.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांना प्रवेशपत्रावर असलेली त्यांची वैयक्तिक माहिती (नाव, परीक्षा केंद्र, रोल नंबर इ.) काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास ताबडतोब ICAI शी संपर्क साधा, अशी सूचना इंस्टीट्यूट ने दिली आहे. 

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?

* सर्वप्रथम, उमेदवारांनी ICAI वेबसाइट eservices.icai.org ला भेट द्यावी.
* यानंतर उमेदवारांनी “सीए इंटर किंवा फायनल मे २०२५ प्रवेशपत्र” या लिंकवर क्लिक करावे.
* नंतर उमेदवारांचे लॉगिन तपशील (नोंदणी क्रमांक आणि एसएसपी पासवर्ड) प्रविष्ट करा.
* यानंतर उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
* आता उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढावी.