MH CET: विद्यार्थ्यांना पीसीबी ग्रुपबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 'ही' अखेरची तारीख
प्रत्येक प्रश्नामागे विद्यार्थ्यांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Examination) कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी सीईटी पीसीबी ग्रुपची परीक्षा (MHT CET PCB Group Exam for admission to agriculture courses) घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेबाबत जर विद्यार्थ्यांना काही तक्रारी अथवा आक्षेप नोंदवायचे असल्यास त्यांना त्याची नोंद करता येणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षेसाठीचे कोणतेही आक्षेप बुधवार दि. २१ मे पर्यंत नोंदविता येणार आहे.
सीईटी सेलमार्फत यंदा ९ मे ते १८ मे या कालावधीत पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रारी असल्यास त्याबाबतचे आक्षेप नोंदविण्याची मुभा सीईटी सेलने दिली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रश्नामागे विद्यार्थ्यांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीमधून हे आक्षेप नोंदविता येतील, असे सीईटी सेलने सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांवर पुढील कार्यवाहीही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांना ही सुविधा देण्यात आली आहे.
'Objection Tracking' पर्याय लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रश्नांची मांडणी चुकीची असल्यास, पर्याय अस्पष्ट, उत्तरतालिकेमध्ये दिलेली उत्तरे चुकीचे किंवा पर्याय अस्पष्ट असतात. अशावेळी विद्यार्थ्यांना हरकत मांडण्याचा हक्क असतो. मात्र ही संधी केवळ दिलेल्या कालावधीतच उपलब्ध असते. त्यामुळे कोणत्याही विलंब न करता संबंधित उमेदवारांनी हरकत वेळेत सादर करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. हरकत योग्य असल्यास त्या विद्यार्थ्याने भरलेले शुल्कही परत केले जाते.